Advertisement

अखेर सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर

5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते.

अखेर सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर
SHARES

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आला आहे. धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता.

अखेर सलमानला आत्मसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमाननं 1 वर्षांपूर्वी शस्त्र परवानासाठी अर्ज केला होतं अप्लिकेशन मात्र त्यावेळी त्याला परवानगी देण्यात आली नाही.

याआधी सलमानने आपली कार अपग्रेड करुन घेतली होती. त्याने आपली लँड क्रूझर कार बुलेटप्रूफ करून घेतली आणि आर्मर बसवून घेतले. यासोबतच त्याच्या कारच्या सर्व काचा बुलेटप्रूफ करुन घेतल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लँड क्रूझरचे नवीन मॉडेल नसून जुन्या मॉडेलचेच अपग्रेड व्हर्जन आहे.

5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथील सलीम खान यांच्या गार्डला धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानला धमकीच्या पत्रात सिद्धू मूसवालासारखंच तुझंही हाल केले जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे सलमान आणि कुटुंबिंयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक वेळा सलमानला धमक्यांना सामोरं जावं लागलं आहे. लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे.

रिपोर्ट्सनुसार, बिश्नोईने स्वतः पोलिस रिमांडमध्ये खुलासा केला आहे की, 2018 साली सलमान खानच्या हत्येसाठी त्याने सर्व तयारी केली होती. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये दिले होते.हेही वाचा

राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

कतरिना कैफ आणि विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा