Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजही आला रस्त्यावर, हतबल होऊन मांडली कैफियत

सलुन, ब्युटी पार्लरला अत्यावश्यक सेवेत घ्या, अशी मागणी केली जात आहे. मुंबई लाइव्हनं या संदर्भातच काही सलुन मालकांशी बातचित केली.

लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजही आला रस्त्यावर, हतबल होऊन मांडली कैफियत
SHARES

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक, दुकानदार आणि इतर असंघटीत कामगारांना बसत आहे. याचदरम्यान सलुन आणि ब्युटी पार्लर मालकांनाही या लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. सलुन, ब्युटी पार्लरला अत्यावश्यक सेवेत घ्या, अशी मागणी केली जात आहे.

मुंबई लाइव्हनं या संदर्भातच काही सलुन मालकांशी बातचित केली. सोशल बार्बर म्हणून ओळखले जाणारे रविंद्र बिरारी यांनी देखील आपली कैफियत मुंबई लाइव्हशी शेअर केली.

पहिल्या लॉकडाऊन वेळी आम्ही कसंबसं जगलो. साठवलेले पैसे होते म्हणून पहिला लॉकडाऊन आम्ही काढला. पण आता हे शक्य नाही. वीजेचं बिल भरावं की घरात अन्न धान्याची सोय करावी, असा प्रश्न पडला आहे. साठलेले पैसे आता संपण्यातच जमा आहेत.

रविंद्र बिरारी

तर सलुनमध्ये काम करणारे विकी शिंदे म्हणाले की, सरकारनं आम्हाला आर्थिक मदत तरी करावी. नाहीतर आम्हाला आठवड्यातून २ ते ३ दिवस सलुन उघडण्याची परवानगी द्यावी. सगळ्या नियमांचं पालन केलं जाईल.

दरम्यान, सलुन, ब्युटी पार्लरला अत्यावश्यक सेवेत घ्या, या मागणीसाठी राज्यातील सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. त्या अनुषंगाने राज्यातील सलुन, ब्युटी पार्लर अत्यावश्यक सेवेत घ्या, तसेच त्यांनी लॉकडाऊनदरम्यान व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली.

तसंच कोरोना काळात वैद्यकीय मदतीसाठी नाभिक समाजाच्या जागेची गरज लागल्यास सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन असोसिएशन तर्फे दिलं गेलं. तसंच सरकारला जर आर्थिक पॅकेज देणं जमत नसेल तर मग सलून आणि ब्युटी पार्लरची दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी यावरसुद्धा सविस्तर चर्चा केली गेली.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा