Advertisement

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्याचे ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण


पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्याचे ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण
SHARES
मुंबईत जस्तीचा पाऊस झाल्यास अनेक सखल भागात पाणी साचतं. त्याशिवाय पावसाळ्यात साचलेले पाणी, सांडपाणी, अस्वच्छता अशा ठिकाणी डासांची पैदास होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टाइफाइडसारखे रोग डोके वर काढतात. याचा धोका रेल्वेच्या करखान्यांमध्ये होऊ शकतो. त्यामुळं करखान्यामध्ये ड्रोनच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करत आहे.

रोगराईचा फैलाव होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे लोअर परळ कारखान्याचे ड्रोनच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करत आहे. दररोज १२ तासांत १५ लिटर औषधाची फवारणी केली जात आहे. भारतात असा रेल्वेनं पहिल्यांदाच प्रयोग केल्याचा दावा पश्चिम रेल्वेनं केला.

रेल्वेच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात सामान असते. यात लोकल गाड्या, त्यांना लागणारे अन्य साहित्य तसेच भंगाराचे सामान मोठ्या प्रमाणात असते. त्यातच कारखान्यातून गटार, मल्लनिस्सारनवाहिनी जात असतात. अशा ठिकाणी डासांची पैदास होऊन अन्य रोगराईला निमंत्रणच दिले जाऊ शकते. 

काही दिवसांपूर्वीच लोअर परळ कारखान्यात साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ सर्वत्र पसरला. त्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने कारखान्यानेच निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी औषधाची फवारणी कर्मचाऱ्यामार्फत न करता ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कारखान्याच्या ज्या भागात कर्मचारी पोहोचू शकत नव्हता, तेथेही काही उंचीवर जाऊन फवारणी करण्यात आली.

रेल्वेचे छत, गटार, मल्लनिस्सारनवाहिनी, पाण्याचे पाईप इत्यादी ठिकाणीही फवारणी होण्यास मदत झाली. कारखाना परिसरात ५०० मीटर उंचीवरून प्रत्येक दिवशी १२ तासांत १५ लिटर औषध फवारणी करण्यात आली. हे काम यापुढीही काही दिवस सुरूच राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.



हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा