Advertisement

आरेत वनदूर्गा पूजा


आरेत वनदूर्गा पूजा
SHARES

'सेव्ह आरे ग्रुप'कडून शनिवारी आरेमध्ये वनदूर्गा पूजा आणि सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रो-3 प्रकल्पाअंतर्गत आरेत कारडेपो बांधण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. त्यामुळेच आरे वाचवण्यासाठी 'सेव्ह आरे' ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत शनिवारी वनदूर्गा पूजा करण्यात आली.

या पुजेला आरेतील रहिवासी आणि मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. आरे वाचवण्यासाठी कुठल्याही प्रकारची लढाई लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांची कत्तल होत असताना कार डेपोसाठी मुंबईचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरे कॉलनीतील शेकडो झाडांवर घाव घालण्यात येणार आहे. असे झाल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने 'सेव्ह आरे'ने आरे बाचवण्यासाठी न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून आरेत वनदूर्गा पूजा, हवन करण्यात आले.

यावेळी 'सेव्ह आरे ग्रुप'ने आरेत मोठ्या संख्येने झाडे लावली. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आरे वाचवण्याची प्रतिज्ञा घेतल्याची माहिती 'सेव्ह आरे'ने दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा