Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती


एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती
SHARES

महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. परिवहन विभागाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. परिवहन मंडळांतर्गत काम करणाऱ्या जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ होणार आहे. याबाबतचं पत्रकत परिवहन आणि खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काढलं आहे.


म्हणून घेतला 'हा' निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागत नाही. त्यामुळे १२वी नंतर मुलांच्या शिक्षणात पैशांचा अडथळा येऊ नये, या दृष्टीकोनातून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना सुरू केली आहे.


दरमहा ७५० रुपये शिष्यवृत्ती

या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी कामगार अधिकारी गरजू विद्यार्थ्यांची नावं मागवून घेणार आहेत. त्यातून कागदपत्रांची पूर्तता केलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे शिष्यवृत्तीचे पैसे संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा केलं जाणार आहे. प्रत्येक कामगाराच्या दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement