मुंबईत शाळेचे डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

दक्षिण मुंबईतील काही शाळांमधून घरचं ताजं, स्वच्छ, सकस अन्न शाळेत पोहोचवायला डबेवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आल्याचं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

SHARE

जंक फूड खाल्ल्यानं विद्यार्थ्यांच्या तब्येतीत बिघाड होण्याची शक्याता असते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शासनानं शाळेत जंक फूड विकण्यास बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उत्तम निर्णय असून सर्व स्तरातून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील काही शाळांमधून घरचं ताजं, स्वच्छ, सकस अन्न शाळेत पोहोचवायला डबेवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आल्याचं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केलं आहे.


डबेवाल्यांची मागणी

शाळा प्रशासनाने ज्या मुलांना घरचे अन्न खायचे आहे त्यांना ते खाऊ द्यावेत, अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील बऱ्याच शाळा प्रशासनानं डबेवाल्यांना शाळेत डबे आणण्यास मनाई केली आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांनी कपडे, बुट, वह्या, पुस्तकं शाळेतूनच घेण्याचे आदेश काढतात. त्यामुळं नाईलाजानं पालकांना ते आदेश पाळावे लागतात. शिक्षणाबरोबर शाळा प्रशासन आता व्यवसायही करायला लागलं आहे. शाळा प्रशासन आणि कँटिंग मालक यांचं साटेलोटे आहे. कँटिंगवाल्यांचा धंधा जोरदार व्हावा म्हणून विद्यार्थ्यांचं घरचं जेवण बंद केलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कँटिंगचे महागडे पदार्थ खावे लागतात.


डबेवाल्यांना बंदी

पालकांना मुलांना घरचा डबा खाऊ घालायचा आहे, पण शाळा प्रशासनाला विरोध करणार कसा? कारण आपला मुलगा त्यांच्या शाळेत शिकतो आहे. त्याच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून पालक गप्प बसतात. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत त्यांना पत्र दिलं होतं. या पत्रात 'ज्या शाळा प्रशासनानं मुलांचे डबे शाळेत आणायला डबेवाल्यांना बंदी घातली आहे ती उठवावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना घरचं स्वच्छ, ताजं, सकस अन्न मिळेल. तसंच, शाळेचे डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचा रोजगारही टिकेल' असं या पत्रात मांडण्यात आलं होतं.


रोजगार वाचवण्याची मागणी

दरम्यान, याबाबत अद्याप शाळा प्रशासनानं व शिक्षणखात्यानं काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळं शाळेचे डबे पोहोचवणाऱ्या डबेवांल्यांनवर उपासमारीच वेळ आली आहे. शाळा प्रशासन व शिक्षणखाते यांनी शाळेत डबे देता येतील, असा निर्णय घ्यावा व डबेवाल्यांचा रोजगार वाचवावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.हेही वाचा -

दादरमधील पोलीस वसाहतीत आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीतसंबंधित विषय
ताज्या बातम्या