दादरमधील पोलीस वसाहतीत आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधील (सैतान चौकी) एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळं ही आग लागल्याची माहिती मिळते आहे.

दादरमधील पोलीस वसाहतीत आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
SHARES

दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधील (सैतान चौकी) एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत श्रावणी अशोक चव्हाण (१५) या मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून सिलिंडरच्या स्फोटामुळं ही आग लागल्याची माहिती मिळत आहेया घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तसंच, ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र, या आगीत ३ घरांचं नुकसान झाल्याचं समजतं आहे.


तिसऱ्या मजल्यावर आग

पोलीस वसाहतीमधल्या क्रमांक पाचच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर श्रावणी राहत होती. आग लागली त्यावेळी श्रावणी घरात एकटीच होती. रविवारी दुपारी श्रावणीचे आईवडील हे लग्नाकरिता बाहेर गेले होते. त्यावेळी तिच्या घराला आग लागली. तिसऱ्या मजल्यावरील काही रहिवाशांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावेळी तातडीनं अग्निशमन दलाच्या चार फायर इंजिन आणि ३ टँकर घटनास्थळी दाखल झाले.


घटनेचा तपास सुरू

आगीमध्ये जखमी झालेल्या श्रावणीला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. आगीची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते. त्याशिवाय न्याय सहायक प्रयोगशाळेचे एक पथक देखील घटनास्थळी आलं होतं. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून त्याचा अहवाल दादर पोलिसांना देणार आहेत. त्याशिवाय, दादर पोलीस देखील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत

तरुणीशी अश्लीलचाळे, रोडरोमियोसह पोलिसाला ही अटकRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा