Advertisement

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत

कोपर स्थानकाजवळील रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळाला तडा गेल्यानं डोंबिवलीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या वाहतूक ५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे.

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत
SHARES

कोपर स्थानकाजवळील रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळाला तडा गेल्यानं डोंबिवलीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या वाहतूक ५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास रुळाला तडा गेल्यानं ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे चांगलाच हाल झाले आहेत.


लोकल उशीरानं

कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मुंबईकडं येणाऱ्या सर्व लोकस गाड्या डोंबिवली स्थानकात थांबवण्यात आल्या. ऐन गर्दीच्यावेळी सुमारे २० ते २५ मिनिटे गाड्या ऐकाच ठिकाणी थांबल्यानं कामावर जाण्याऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याशिवाय, दिवा, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.


वाहतूक धीम्या गतीनं सुरू

याबाबत माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे. तसंच, अप धीम्यामार्गावरून ही वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाल्याचं माहिती मिळते आहे.



हेही वाचा -

मुंबईनं चौथ्यांदा जिंकली आयपीएल, चेन्नईवर १ धावेनं मात

व्हायरल व्हिडिओ अंगलट, विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसावर कारवाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा