Advertisement

स्कूल बस असोसिएशन 1 ऑगस्टपासून संपावर


स्कूल बस असोसिएशन 1 ऑगस्टपासून संपावर
SHARES

राज्यातील स्कूल बस असोसिएशने पुन्हा एकदा अक्रमक पवित्रा घेतला आहे. नियमांना धरून न चालणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून स्कूल बस असोसिएशनकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे अशा स्कूल व्हॅनवर कारवाई न केल्यास 1 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दिला आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात 7500 स्कूल बसेस आणि व्हॅन आहेत. रोज हजारो विद्यार्थ्यांची या बसमधून ने-आण केली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्यावर असते. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची असल्यामुळे सरकारने स्कूल बसप्रमाणेच स्कूल व्हॅनसाठी धोरण जाहीर केले आहे. त्या धोरणानुसार नियमांची अंमलबजावणी करणे प्रत्येक स्कूल व्हॅन मालकाला सक्तीचे आहे. मात्र अनेक स्कूल व्हॅनचालक या नियमांची पूर्तता करताना दिसत नाहीत. नियम मालकांकडून पायदळी तुडवले जात आहेत, असा आरोप स्कूल बस असोसिएशनने केला आहे.


याआधीच राज्य सरकारला विनंती आणि निवेदन दिले होते. सरकारने आम्हाला लवकरात लवकर धोरण अंमलबजावणी करु, असे अश्वासनही दिले. मात्र, अद्याप सरकारने कोणतेच पाऊल उचललेले नाही. धोरण जाहीर न झाल्यामुळे आम्ही संपाबाबत विचार करत आहोत.

अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस असोसिएशन


काय आहेत स्कूल व्हॅन आणि बससाठीचे नियम?

शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वाहन कंपन्यांसोबत करार करणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळांचीच असेल.


...या नियमांचे पालन व्हायलाच हवे!


  • शालेय बसमध्ये प्रशिक्षित चालक असणे
  • चालकास 5 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असणे
  • वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी त्याला दंड झालेला नसावा
  • वाहतुकीचा परवाना असावा
  • ती बस फक्त शाळेच्या वापरासाठी असावी
  • स्कूलबस 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसाव्यात
  • बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नसावेत
  • प्रत्येक बसमध्ये सुरक्षा खांब, संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग (आपत्कालीन खिडकी), प्रथमोपचार संच आणि अग्निशमन यंत्र असावे
  • किमान दोन अटेंडंट बसमध्ये असायला हवेत.



हेही वाचा - 

कराराशिवाय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास खासगी कंत्राटदारांना मनाई


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा