Advertisement

स्कूल बस बंद, पालकांना त्रास

शुक्रवारी २० जुलै रोजी मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर स्कूल बस धावणार नसल्याची घोषणा असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. या एकदिवसीय संपामुळे शुक्रवारी मुलांना लवकर तयार करून शाळेत सोडण्याची दुहेरी कामगिरीही पालकांना पार पडावी लागणार आहे.

स्कूल बस बंद, पालकांना त्रास
SHARES

देशभरातील माल वाहतुकदारांनी शुक्रवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनालामुळे पालकांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. कारण स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही याला पाठिंबा दिला आहे. यामुळे शुक्रवारी २० जुलै रोजी मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर स्कूल बस धावणार नसल्याची घोषणा असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

या एकदिवसीय संपामुळे शुक्रवारी मुलांना लवकर तयार करून शाळेत सोडण्याची दुहेरी कामगिरीही पालकांना पार पडावी लागणार आहे.


स्कूल बस ओनर्सचा पाठिंबा

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीअंतर्गत आणण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशभरात चक्काजामची हाक दिली आहे. या आंदोलनास स्कूल बस ओनर्स असोसिएशनतर्फे पाठिंबा दर्शवण्यात आल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितलं.

वाढत्या महागाईमुळे विशेषत: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे आम्हाला फटका बसत आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर जीएसटीमध्ये आणले जाऊन राज्यभरातील स्कूल बस टोल फ्री करण्याची मागणी केली आहे. यासह इतर मागण्यांसाठी स्कूल बसचा एकदिवसीय संप पुकारण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी ने-आण करण्यासाठी स्कूल बस येणार नाही, याची दखल पालकांनी घ्यावी.
अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोशिएन


हेही वाचा -

शुक्रवारपासून वाहतुकदारांचा बेमुदत संप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा