Advertisement

शुक्रवारपासून वाहतुकदारांचा बेमुदत संप

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरूवात होणार अाहे.

शुक्रवारपासून वाहतुकदारांचा बेमुदत संप
SHARES

देशात डिझेलचे समान दर, टोलदरातून सवलत मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेतर्फे शुक्रवारी २० जुलैपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरूवात होणार अाहे. या संपात स्कूल बस, खासगी बस, मालवाहतूकदार, टॅक्सी यांसह इतर वाहनं सहभागी होणार अाहेत.


३ हजार संघटनांचा पाठिंबा

सध्या देशभरातील मालवाहतूकदारांना इंधन दरवाढ, टोल अाकारणीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर केंद्र सरकारनं अजून कोणताही तोडगा काढला नसल्यानं अखेरीस २० जुलैपासून संपाची हाक देण्यात आली आहे. सरकारकडे मांडण्यात आलेल्या मागण्यांकडं दुर्लक्ष झाल्यानं संपाचा निर्णय घेण्यात येत असून संपाला ३ हजारांपेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.


देशव्यापी संप 

मालवाहतूकदार संघटनेने केलेल्या मागण्यांमध्ये देशात डिझेलचे समान दर, इंधनांवर जीएसटी सूट, वाहन विमा कमी करणे, स्कूल बसला टोल माफी, शाळांच्या अासपास पार्किंगची सुविधा, मुंबईच्या अासपासचे सर्व टोल हटवणे, स्कूल बसेसना वाहन योग्यता प्रमाणपत्र सहज मिळावे, तसंच ३ वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र द्यावे अादी मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. या संपामध्ये महाराष्ट्रातील संघटनाही सहभागी होणार अाहेत. देशातील ९३ लाखांपेक्षा अधिक ट्रक-टेम्पो, ५० लाखांहून अधिक बस, टॅक्सी संपात सामील होणार आहेत.


ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेतर्फे संपूर्ण वाहतूकसेवा उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपात स्कूल बस असोसिएशनही सहभागी होणार असून फक्त एक दिवस स्कूल बस बंद राहणार आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला खासगी गाडीतून शाळेत सोडावे.
- अनिल गर्ग,  अध्यक्ष, स्कूल बस असोसिएशनमालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढते इंधन दर आणि टोलचा भुर्दंड अाता सहन करण्यापलीकडं गेला अाहे. यातच थर्ड पार्टी प्रिमियम आणि वाहनधारकांना अन्यायकारक प्राप्तिकर लागू केल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.
 - बाल मल्कित सिंग, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनाहेही वाचा -

जोगेश्वरी-अंधेरीदरम्यान लोकलकोंडीने वाहतूक विस्कळीत

एल्फिन्स्टन झालं प्रभादेवी!
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा