• महापालिकेच्या कामाचा फटका शाळकरी मुलांना
  • महापालिकेच्या कामाचा फटका शाळकरी मुलांना
SHARE

चेंबूर - 15 दिवसांपासून चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावर पालिकेकडून पाण्याची पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम कासवगतीनं सुरू असल्याचा फटका येथील शाळकरी मुलांना बसला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याच भागात गुरूनानक हायस्कूलही असल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. इथे काम करणारे कर्मचारी दोन दिवसांपासून अर्धवट काम ठेवून गेल्याचा आरोप मनोहर कांबळे या दुकानदारानं केलाय. अशा कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही कांबळे यांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या