Advertisement

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी


मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
SHARES

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे. कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे जीव गेला आहे. काही दिवसांपूर्वी तिला उपचारासाठी मुंबईच्या कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी म्हणजेच 12 मे रोजी तिचा मृत्यू झाला. वरळीतील 18 महिन्यांच्या चिमुकल्याचा 28 एप्रिलला स्वाईन फ्लूमुळे पहिला बळी गेला होता. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल केले. पण, 6 तासांच्या उपचारानंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महाराष्ट्रात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे जवळपास 200 रुग्ण आढळून आले होते, त्यात 196 जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात मुंबईतील केवळ कुर्ला परिसरातून 6 रुग्ण आढळले आहेत.

ती महिला जिथे राहते त्या परिसरातील 3,776 रहिवाशांची आणि 750 कुटुंबांची आम्ही तपासणी केली. त्या तपासणीतून 6 जणांना ताप असल्याचे समोर आले. त्यानंतर लगेचच उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

राज्यभरात 14 मेपर्यंत 196 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे स्वाईन फ्लूचा आकडा आणखी वाढू शकतो. सावधगिरीचा इशारा म्हणून व्हायरल इन्फेक्शनसाठी स्क्रीनिंग करत आहोत. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्यांची जास्त काळजी घेण्याचे आवाहनही डॉक्टरांकडून करण्यात आले असल्याचे राज्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा