Advertisement

'सेल्फी विथ खड्डा'चा नवा ट्रेंड !


'सेल्फी विथ खड्डा'चा नवा ट्रेंड !
SHARES

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी भीषण परिस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंतची डेडलाईन देऊन महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचे जाहीर केले. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क खड्ड्यांसोबत सेल्फी काढून सत्ताधाऱ्यांना चांगलाच चिमटा काढला. 


'सर्वांनी असा सेल्फी काढा'

सुप्रिया सुळे यांनी सर्वांना असे सेल्फी काढण्याचे आवाहन केले. यालाच प्रतिसाद देत मुलुंडमधील खड्ड्यांसोबत सेल्फी काढत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी अभिजित चव्हाण यांनी सेल्फी विथ खड्डा हा ट्रेंड मुलुंडमध्येही रुजू केला आहे.'याची' पालिकेकडून तातडीने दखल

मुलुंड पश्चिमेकडील सरोजिनी नायडू रस्त्यावर रेशनिंग कार्यालयासमोर मोठा खड्डा तयार झाला होता. त्यासोबत सेल्फी काढत अभिजित यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. गम्मत म्हणजे लालफितीच्या कारभाराने बरबटलेल्या पालिकेने देखील तातडीने दखल घेत ते खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे 'सेल्फी विथ खड्डा' हा नवा ट्रेंड चांगलाच रंगणार यात शंका नाही.

संबंधित विषय