दहशतवादाचा संबंध आर्थिक राजकारणाशी - डॉ. राम पुनियानी

Prabhadevi
दहशतवादाचा संबंध आर्थिक राजकारणाशी - डॉ. राम पुनियानी
दहशतवादाचा संबंध आर्थिक राजकारणाशी - डॉ. राम पुनियानी
See all
मुंबई  -  

सत्यशोधक रिसोर्स अँड स्टडी सेंटरतर्फे 'दहशतवाद आणि भारतीय लोकशाही' या विषयावर शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवन येथे झालेल्या या व्याख्यानात आय टी प्राध्यापक डॉ. राम पुनियानी यांनी  'दहशतवाद आणि भारतीय लोकशाही' या विषयावर भाष्य केले. यावेळी बोलताना राम पुनियानी म्हणाले, जगातील सर्वच मुस्लिम दहशतवादी नसतात. पण सर्व दहशतवादी मुस्लिम असतात असे म्हटले जाते. परंतु या गोष्टीशी मी सहमत नाही. कारण जगात दहशतवाद फक्त इस्लामी लोक करत नाहीत तर इतरही लोक आतंकवादी आहेत. दहशतवाद फैलावतात. त्यामुळे आपण आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सध्या समाजातील शेतकऱ्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. भूमिहीन शेतकरी आता बेरोजगार होत आहेत. देशात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते हे फार वाईट आहे. भारतीय संविधान विदेशी मूल्यांवर आधारित आहे ते भारतीय ग्रंथांच्या आधारावर सुरू करावे असे, अनेकांचे मत आहे. पण सध्या मुद्दा हा आहे आपण समाजाला कसे बदलायचे. इथे कोणत्याही धर्माचा प्रश्न नाही पण प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचा प्रश्न आहे. सोशल मीडिया समाजाला योग्य वळण देऊ शकते पण त्याचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी दहशतवादावर प्रामुख्याने भाष्य केले ते म्हणाले, दहशतवादी हा एक समाज आहे. दहशदवादी हे प्रत्येक धर्माशी संबंधित असतात. ते निर्माण होतात. दहशतवादाचा संबंध आर्थिक राजकारणाशी आहे हे ही तितकेच मोठे सत्य आहे. भारतीय राज्यघटनेचा गैरवापर केला जातो. त्यातील तरतुदींचा गैरवापर केला जातो तिथे खऱ्या अर्थाने देशद्रोह होतो. तो देशद्रोह आहे. आजही देशातील अनेक भागात व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे याचा विचार केला जातो. यामुळे देशातील विचार दुभंगले जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रवाद निर्माण झाला. दहशतवादला अनेकदा राजकीय आर्थिक पाठिंबा समाजातील काही घटकांकडून मिळाल्यामुळे दहशवादासारख्या घटना घडतात असे मत त्यांनी यावेळी मांडले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.