Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधा उपलब्ध, संघाचीही होणार स्थापना


ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधा उपलब्ध, संघाचीही होणार स्थापना
SHARES

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण २३ विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक संघांची स्थापना करण्यात येणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक संघांची वर्षातून दोनदा बैठका घेतल्या जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


कार्यक्रमात यांची उपस्थिती होती

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्य मंदिरात शनिवारी संपन्न झाला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रारंभी वयाचे ९० वर्ष पूर्ण केलेल्या सखाराम पाताडे, एम. के. फटनाणी, विरप्पा काकनकी, एस. पी. गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्ण, केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, आदी ज्येष्ठ नागरिकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


मनाने तरुण राहिल्यास वयाची जाणिव होत नाही

आपण वयाने जरी मोठे असल पण मनाने तरुण राहिलो की वयाची जाणिव होत नाही, याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला हा आजचा कार्यक्रम असल्याचे सांगत महापौरांनी ज्येष्ठ नागरिकांना ‘बेस्ट’ च्या बस भाड्यामध्ये यापुढे ५० टक्के सुट देणार असल्याचे जाहीर केले. प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात तारुण्य, संपत्तीे, सौंदर्य, सत्ता याचा कधीही अहकांर न बाळगता आपण समाजव्यसवस्थेचे एक घटक असून लोककल्याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.


'जास्तीत जास्त जण या संघाचे सदस्य व्हा'

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी एकटे न राहता ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होण्याचा सल्ला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय औंधे यांनी दिला, आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने २३ विरंगुळा केंद्र उभारले असून आर/ दक्षि‍ण विभागात पुढील केंद्र सुरू करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच ज्येष्ठ नागरिक संघाची स्थांपना करण्यात येत असून वर्षातून संघाच्या दोन बैठका घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा