Advertisement

कुरारमधील ज्येष्ठ नागरिकांना मिळाली ‘कट्टा’ची जागा


कुरारमधील ज्येष्ठ नागरिकांना मिळाली ‘कट्टा’ची जागा
SHARES

मालाड कुरार व्हिलेजमधील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कुठे जागाच उपलब्ध नसल्यानं अखेर पदपथांवरच कंटेनर उभारून त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा ‘कट्टा’ आता कंटेनर ऑफिसच्या माध्यमातून रंगणार आहे.


ज्येष्ठांच्या हक्काचं कार्यालय

कुरार व्हिलेजमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कुठेही निश्चित जागा नसल्यामुळे स्थानिक शिवसेना आमदारांनी त्यांना हक्काचं कार्यालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कुरार व्हिलेजमधील कंटेनरमध्ये ज्येष्ठांसाठी कार्यालयवजा बसण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या आमदार निधीतून या कार्यालयाचं बांधकाम करण्यात आलं. याचं उद्घाटन खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत कदम, गणपत वारिसे, सुनील गुजर, चंद्रकांत वाडकर, सायली वारिसे, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, पूजा चव्हाण, रीना सुर्वे, शाखप्रमुख राजू घाग, संजीवनी रावराणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे एकनाथ हळदणकर, शांताराम पेडणेकर, आनंद खोबरेकर आदी उपस्थित होते.


समस्यांबाबत योग्य मार्गदर्शन

या माध्यमातून कुरारगावमधील ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुविधा, बँकेच्या कामासाठी सल्ला-मार्गदर्शन आणि घरगुतीवादासह सर्व प्रकारच्या समस्यांमध्ये मदत आणि मार्गदर्शन मिळणारे हक्काचे कार्यालय मिळालं आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हे केंद्र फायदेशीर ठरेल, असा विश्वास खासदार किर्तीकर यांना व्यक्त केला. तर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल, असे ठाम आश्वासन आमदार सुनील प्रभू यांनी यावेळी दिले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा