Advertisement

मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसत होतं. उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे.

मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतीव उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं दिसून आलं आहे. तर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात मुंबईतील २४ विभागांमधील १० हजार १९७ नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यामध्ये ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचं दिसून आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसत होतं. उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. तर, याउलट चित्र झोपडपट्टी भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. 

मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण झाले असून मार्च २०२१ मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत हे सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २७ टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती. मात्र हे सर्वेक्षण काही प्रभागातच झाले होते. 

मुंबईतील काही भागांत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असतानाच दुसरीकडे नवीन रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा