माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा

 Kings Circle
माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा
माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा
माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा
माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा
माटुंग्यात 10 फुटांचा खड्डा
See all

माटुंगा - माटुंगा पोस्ट ऑफिस समोर माटुंगा फुलमार्केटमध्ये तेलगंणा रोडवर 10 फूट खोल एवढा खड्डा पडला आहे. प्रत्यक्षदर्शी फुले विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार खड्डा पडला त्यावेळी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एखादा बॉम्ब स्फोट व्हावा तशी माती, दगड वर उडाले, आणि लोकांची धावपळ उडाली, परंतु सुदैवाने कोणतीही यावेळी जखमी झाले नाही. कोणत्याही प्रकारची मोठी हानी देखील झाली नाही. या घटनेनंतर काही वेळातचं महापालिकेच्या एफ नॉर्थ वॉर्डमधील कर्मचाऱ्यांनी पाहणी करुन या रस्त्यावरील वाहतूक तत्काळ बंद केली. पंपिंगच्या अतिरीक्त प्रेशरमुळे आणि सेव्हरेज लाइन जुनी असल्याने ती फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज दर्शविला जात आहे. अचानक हा खड्डा पडल्यामुळे परिसरात भीतीचे वाचावरण पसरले होते, अशी माहीती फुलं विक्रेत्यांनी दिली. दरम्यान आता रस्ता पूर्ववत करण्याचं काम सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Loading Comments