Advertisement

शिवडीकरांनी 'अशा' प्रकारे स्वत: ला करून घेतलं 'क्वारनटाइंन'


शिवडीकरांनी 'अशा' प्रकारे स्वत: ला करून घेतलं 'क्वारनटाइंन'
SHARES
देशावर सध्या कोरोना या संसर्ग रोगाचे थैमान आहे.हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण प्रशासन त्याच्याशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करून सुद्धा ठिकाणी नागरिक बेशिस्त रित्या फिरताना दिसतात. माञ शिवडीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेऊन स्वत:ला अशा प्रकारे क्वारनटाइंन करून घेतले आहे.


शिवडी परिसरात झोपडपट्टी, मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू नागरिकांनी व्यापलेला परिसर आहे. या परिसरात अद्याप कुठलाही कोरोनाचा संसर्ग आढळला नाही. याचे कारण म्हणजे या परिसरातील स्थानिक नागरिकांनी घेतलेली खबरदारी. या परिसरात नियमांचे पालन करत लोक कोरोना सारख्या संसर्गाला रोखले जात आहे. अनाश्यकरित्या कुणी ही घराबाहेर पडत नाही. तर अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन तास अशा वेळ ठरवून घेतलेल्या आहेत. झोपडपट्टी परिसरातील मुख्य दार हे बँरिकेट्स, किंवा बांबूनी बंद केले आहेत. तर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावले आहे.तर नागरिक तरी विनाकारण बिल्डिंग परिसरात थांबू नये याबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत.


परिसरात सकाळी 9 ते 12 तर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मोकळ्या ठिकाणी भाजीपाला मंडई सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे नागरिकांना ही या वेळेतच इमारतीची दार खुली केली जातात. इतर वेळी इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून त्याला कुलूप लावले जात. त्यानंतर कुणालाही बाहेर जाता किंवा आत येता येत नाही. तसा फलकच प्रत्येक सोसायटी आणि चाळीतील नागरिकांनी लावले आहेत. परिसरात वारंवार नागरिक इमारतीतून खाली उतरू नये म्हणून ठरलेल्या दोन तासाच्या वेळेतच लिफ्ट सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळचे दोन तास वगळता, इतर वेळी तुरळक नागरिक या  परिसरात वावरताना दिसतात.

मूळात नागरिकांनीच या संसर्गाला आपल्या परिसरात थारा न देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच बरोबर परिसरात पालिकेकडून सर्व ठिकाणी जंतूनाशक फवारणी ही करण्यात आली आहे. तसेच तळहातावर पोट असलेल्यांसाठी समाजसेवी संघटनांकडून दररोज हजारो कामगार, गरीब वस्तींमध्ये जेवणाचे वाटप करण्यात येत असल्याचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा