'दी ट्री हाउस' शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धेाक्यात

बोरीवली - दहिसर आणि बोरिवलीत लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेले स्कूल दी ट्री हाऊस बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षही पूर्ण झालं नाही आणि स्कूल दी ट्री हाऊस अचानक बंद पडलं. त्यामुळे मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. काही पालकांनी या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. फक्त आईसी कॉलनीतील दोन ट्री हाऊस सध्या चालू आहेत. पण दहिसरमधल्या स्कूल दी ट्री हाऊसला टाळे लागलेय. तर स्कूल दी ट्रीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा चार महिन्यांचा पगार अजूनही झाला नाहीये.

दी ट्री हाउसच्या मुंबईत अनेक शाखा आहेत. नर्सरी ते सीनियर केजीपर्यंत इथं मुलांना शिकवलं जातं. एक मुलांची फी 28 हजार ते 32 हजार इतकी आहे. बोरिवलीच्या आईसी कॉलनीत 53 आणि दहिसरच्या शाखेत 50 मुलं शिखायला आहेत.

Loading Comments