Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

शीतल आमटे यांची आत्महत्या, जाणून घ्या त्यांचा प्रवास

शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी चंद्रपूरमधल्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

शीतल आमटे यांची आत्महत्या, जाणून घ्या त्यांचा प्रवास
SHARES

ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे (dr sheetal amte) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी चंद्रपूरमधल्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.


कुटुंबात होते वाद

२०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आणि यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना पद देण्यात आले. यादरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिवपदाचा राजीनामा दिला.

डॉ. शीतल आमटे-कराजगी आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होत्या. त्यांचे पती गौतम-कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, गौतम कराजगी आनंदवनाच्या कामकाजात एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखे व्यवहार आणण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेच आमटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सोमवारी २० नोव्हेंबर २०२० रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. शीतल यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले.

परंतू, एका तासानंतर शीतल यांनी तो फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ काढून टाकला. यानंतर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर सोमवारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

कोण होत्या शीतल आमटे?

डॉ. शीतल आमटे या बाबा आमटे यांचे पुत्र विकास आणि सुन भारती आमटे यांच्या कन्या होत्या. २००३ मध्ये नागपूरमधून वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घरातील समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे ठरवलं आणि आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते.हेही वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्राद्वारे अभिवादन

मास्कचा वापर न करणाऱ्या महापालिका पुरवणार मास्क

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा