Advertisement

मास्कचा वापर न करणाऱ्या महापालिका पुरवणार मास्क

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासनानं मास्क घालणं व सामाजिक अंतर ठेवणं बंधनकारक केलं आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्या महापालिका पुरवणार मास्क
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासनानं मास्क घालणं व सामाजिक अंतर ठेवणं बंधनकारक केलं आहे. पंरतु, अनेक जण हे मास्कचा वापर टाळत असून, समाजिक अंतराच्या नियमांचं पालनही करत नाहीत. याबाबत वारंवार सुचना करुनही नागरिक मास्कचा वापर करत नसल्यानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसंच, आता नागरिकांना आपल्या चुकीचं जाणीव व्हावी यासाठी दंडात्मक कारवाईनंतर त्यांना विनामुल्य मास्क देण्यात देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे. मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र तरीही अनेक नागरिक मास्क न लावता किंवा मास्क हनुवटीवर ओढून फिरतात. अशा लोकांकडून दंड वसूल केला जातो.

दंड केल्यानंतर नागरिक पुन्हा मास्क न लावता पुढे जातात. त्यामुळं मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्कदेखील महापालिकेकडून मोफत पुरविली जाणार आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद दंडाच्या पावतीवरदेखील केली जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा