Advertisement

गरजूंना बसणार फटका? शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे.

गरजूंना बसणार फटका? शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता
SHARES

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळ ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे.

महाविकास आघाडीच्या काळात शिवभोजना थाळी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतंर्गत १० रुपयात जेवण मिळत होते. कोरोना काळात याच थाळीचे दर ५ रुपये करण्यात आले होते.

शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही याचा आढावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण घेणार आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार आहेत.

शिवभोजन थाळीची खरोखर गरज आहे का? याचा विचार केला जाणार आहे. ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे याचाही आढावा घेतला जाणार आहे. हे सगळं पाहून कॅबिनेटसमोर शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो.

राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.हेही वाचा

नियम न पाळणाऱ्या शिवभोजन केंद्रावर सरकार करणार कारवाई

नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ ऑफर, 19 रुपयांत करा 10 वेळा प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा