Advertisement

पार्लेकरांची दंतचिकित्सा


पार्लेकरांची दंतचिकित्सा
SHARES

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून विलेपार्ले परिसरात रविवारी ‘दंतचिकित्सा शिबीर’ आणि ‘तंबाखू व्यसनमुक्ती’साठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून तोंडाच्या अंतर्भागात होणाऱ्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली. 'एशियन कॅन्सर फाऊंडेशन’ आणि मंगला भागवत फाऊंडेशन तसेच शिवसेना शाखा क्रमांक 84च्या वतीने हे शिबीर राबवण्यात आले होते.

विलेपार्ले (पूर्व) येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्या अॅड. वीणा भागवत यांचे ‘मंगला भागवत फाऊंडेशन’ आणि शिवसेना शाखा क्रमांक 84 यांच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम पार पडला. सुमारे 500 विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत पाटकर, शुभदा पाटकर, वीणा भागवत, जितेंद्र जनावले, नितीन डिचोलकर आदींसह मोठ्याप्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निमित्ताने हनुमान रोड येथील शिवसेना शाखेचे नूतनीकरण करून शाखा नव्याने खुली करण्यात आली आहे.


हेही वाचा -  

खासगी रुग्णालयांनाही घेता येईल रक्तदान शिबीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा