Advertisement

मरिन ड्राइव्हवरील पहिलं एसी स्वच्छतागृह मंगळवारपासून खुलं

हे स्वच्छतागृह मंगळवारपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे. आगळीवेगळी डिझाईन आणि सर्वात महागडं अशी या स्वच्छतागृहाची ओळख निर्माण झाल्याने हे स्वच्छतागृह सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

मरिन ड्राइव्हवरील पहिलं एसी स्वच्छतागृह मंगळवारपासून खुलं
SHARES

मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू ग्रुप, सामाटेक आणि एनसीपीए यांनी मरिन ड्राइव्हवर संयुक्तिकपणे उभारलेल्या पहिल्या-वहिल्या वातानुकुलित स्वच्छतागृहाचं लोकार्पण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. त्यानुसार हे स्वच्छतागृह मंगळवारपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे. आगळीवेगळी डिझाईन आणि सर्वात महागडं अशी या स्वच्छतागृहाची ओळख निर्माण झाल्याने हे स्वच्छतागृह सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.




मुंबईकर, पर्यटकांसाठी सुविधा

राणीचा हार अर्थात ३.७ किमीचा मरिन ड्राइव्हचा पदपथ म्हणजे मुंबईकरांचं, पर्यटकांचं आकर्षण. अशा या मरिन ड्राइव्हवर पर्यटकांची आणि तरूणाईची नेहमीच गर्दी असते. परंतु मरिन ड्राइव्हवर शौचालयाची व्यवस्था नसल्यानं पर्यटकांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी इथं स्वच्छतागृह बांधण्याची मागणी होत होती. त्यानुसार १ कोटी रुपये खर्च करून मुंबईतलं आतापर्यंतचं सर्वात महागडं असं 'क्लीनटेक वातानुकुलित स्वच्छतागृह' उभारण्यात आलं आहे.




२४ तास राहणार खुलं

मंगळवारपासून हे स्वच्छतागृह सर्वसामान्यांसाठी खुलं होणार असून ते २४ तास खुलं राहणार आहे. या स्वच्छतागृहाची जेएसडब्ल्यू ग्रुप, सामाटेक आणि एनसीपीए यांनी संयुक्तिकपणे उभारणी केली असली, तरी आता हे स्वच्छतागृह महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका या स्वच्छतागृहाचं व्यवस्थापन आणि देखभाल करणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे व्यवस्थापन-देखभाल होणार आहे.




आयुक्त, महापौर गैरहजर

मुंबईत जागेची कमतरता असून स्वच्छतागृहाची निकड आहे. त्यामुळे ३-४ मजली व्हर्टिकल टाॅयलेट काॅम्प्लेक्स उभारण्याची गरज असल्याचं मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. तर या लोकापर्ण सोहळ्याला आयुक्त अयोय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर मात्र गैरहजर होते.



हेही वाचा-

'हे' आहे मुंबईतील सर्वांत महागडं शौचालय!

देवनार डम्पिंग ग्राऊंडमधून सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा