शिवसेना संलग्न 'मुंबई फेरीवाला सेना' फेरीवाल्यांच्या बाजूने लढणार

  Mumbai
  शिवसेना संलग्न 'मुंबई फेरीवाला सेना' फेरीवाल्यांच्या बाजूने लढणार
  मुंबई  -  

  सध्या राज्यभर फेरीवाला मुद्दा गाजत असताना फेरीवाल्यांबाबत शिवसेनेची भूमिका मात्र समोर आली नव्हती. मात्र उशिरा का होईना आता शिवसेना अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांच्या बाजूने लढण्यास सरसावली आहे.


  शिवसेनाप्रणित 'मुंबई फेरीवाला सेना'

  शिवसेनेशी संलग्न असलेल्या ‘मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेनं फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी मुंबईभर मोठी तयारी सुरू केली आहे. यासाठी शिवसेनाप्रणित मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची नियोजन बैठक गोरेगाव येथे पार पडली. या बैठकीत फेरीवाल्यांवर सध्या होत असलेली कारवाई थांबवून त्यांना तातडीनं पर्यायी जागा द्याव्यात, ही मुख्य मागणी मांडण्यात आली.


  'आम्ही त्यांच्या पाठीशी'

  सध्या परवानाधारक अधिकृत फेरीवाल्यांवरही मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करत आहे. यात अनेक मराठी फेरीवाले आहेत. ज्यांचं जगण्याचं आणि रोजीरोटीचं साधनच हिरावून घेतलं जात आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका शिवसेनाप्रणित संघटनेनं मांडली आहे.

  मुंबई फेरीवाला सेनेचे पदाधिकारी लवकरच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे प्रमुख सूर्यकांत महाडिक यांची भेट घेऊन, त्यांची मागणी आणि भूमिका सांगणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.