Advertisement

राणीच्या बागेतील अस्वलाची जोडी ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षक

आता शिवा-शिवानी ही अस्वलाची जोडी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

राणीच्या बागेतील अस्वलाची जोडी ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षक
SHARES

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणी बाग) शिवा नावाचे अस्वल आले आहे. आता शिवा-शिवानी ही अस्वलाची जोडी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

राणीबागेत मागील अनेक कालावधीपासून शिवानी मादी अस्वल एकटेच होते. त्यानंतर, एप्रिल महिन्यात शिवा नावाचे अस्वल नागपूरमधील गोरेवाडा येथून आणण्यात आले. त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता त्याला मादी अस्वलासह सोडण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील शिवा-शिवानी जोडीला पाहता येईल.

राणीबागेत शिवानी अस्वलला २०१९ मध्ये २ ते ३ वर्षांचे असताना सुरतहून आणण्यात आले होते. शिवा आणि शिवानी ही दोन्ही अस्वले सध्या ५ ते ६ वर्षांची आहेत. राणीबागेत दोघे एकत्र फिरत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ पर्यटकांकडून काढण्यात येत आहेत.

शिवा अस्वलाला नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले आहे. त्यामुळे त्याला थेट राणीबागेत न सोडता, काही काळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यानंतर आता त्याला बागेत सोडण्यात आले आहे.

पर्यटकांना आता अस्वलाची जोडी पाहता येणार आहे. दोन्ही अस्वलांना राहण्यासाठी वेगवेगळे कक्ष तयार केले असून त्यांना स्वतंत्रपणे खाद्य दिले जाते.



हेही वाचा

आरेतच उभारणार मेट्रो कारशेड प्रकल्प, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा