Advertisement

शिवस्मारकाची उंची खरंच 210 मीटर हवी ?


SHARES

मुंबई - महाराष्ट्राचे दैवत मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. शिवस्मारक जगातील सर्वात भव्य स्मारक असावे यासाठी सरकार कडून प्रयत्न केला जातोय. शिवस्मारक 192 मीटरवरुन 210 मीटर एवढ्या भव्य उंचीचे व्हावे असा प्रस्ताव शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पर्यावरण मंत्रालयात पाठवणार असल्याचे जाहीर केलयं.

खरचं महाराष्ट्रातल्या गड किल्यांची पडझड सुरु असताना 210 मीटर भव्य उंचीचे शिवस्मारक बांधणे आणि त्यावर बक्कळ पैसा खर्च करणे ही महाराष्ट्राची गरज आहे का? मुंबईकरांना यावर नक्की काय वाटतयं हे आपण जाणून घेतलयं. मुंबईकरांनी शिवस्मारकाच्या मुद्यावर या वेळी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा