Advertisement

आशिष चेंबुरकरांची बेस्ट इतिहासात नोंद, चौथ्यांदा बनले समिती अध्यक्ष


आशिष चेंबुरकरांची बेस्ट इतिहासात नोंद, चौथ्यांदा बनले समिती अध्यक्ष
SHARES

बेस्ट समिती अध्यक्षपदी वरळीतील शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदीही प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज न भरल्याने चेंबुरकर यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे पिठासीन अधिकारी असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घोषित केले. चेंबुरकर यांच्या रुपाने तोट्यात चाललेल्या बेस्टला अनुभवी असलेले समिती अध्यक्ष लाभले आहे. आजवर तीन वेळा बेस्ट समिती अध्यक्ष बनवण्याचा मान काहींनी मिळवला आहे. परंतु चेंबूरकर यांनी चौथ्यांदा समिती अध्यक्ष बनून वेगळा इतिहास रचला आहे.


तोट्यातली बेस्ट नफ्यात आणणार?

बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून त्याला नफ्यात आणण्यासाठी विविध काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी बेस्ट समितीकडून केली जात आहे. बेस्टचे कर्मचारी असलेल्या अनिल कोकीळ यांना बेस्ट समिती अध्यक्ष बनवल्यानंतरही त्यांचा अनुभव तोकडा पडत असल्याने त्यांना पहिल्याच वर्षी या पदावरून पाय उतार करायला लावून बेस्टची माहिती असणारे अनुभवी आशिष चेंबुरकर यांच्याकडे बेस्टची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सन २००२-०३ पासून सलग तीन वर्ष त्यांनी बेस्ट समिती अध्यक्षपद भूषवले होते. परंतु, आता बेस्ट उपक्रम तोट्यात आल्याने आपल्या अनुभवाच्या आधारे उपक्रमाला कशाप्रकारे नफ्यात आणण्याचा प्रयत्न करता येईल? यासाठी शिवसेनेने चेंबुरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे.


याआधी सलग ३ वर्षे अध्यक्षपद

चेंबूरकर यांनी यापूर्वी सलग तीन वर्षे समिती अध्यक्षपद भुषवले. त्यांच्या बरोबरीने दिवंगत विठ्ठल चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी आमदार अरविंद नेरकर, सुरेंद्र बागल, संजय पोतनीस आदींनी दोन ते तीन वर्षे अशा प्रकारे समिती अध्यक्ष पद भूषवले आहे. परंतु चौथ्यांदा समिती अध्यक्षपद भूषवणारे चेंबुरकर हे पहिलेच नगरेसवक ठरले आहेत.

आशिष चेंबुरकर हे सर्वप्रथम मार्च १९९७मध्ये निवडून आले होते. त्यानंतर सलग २०१२पर्यंत ते नगरसेवक होते. त्यानंतर २०१२-१७ या कालावधीत ते नगरसेवक नव्हते. परंतु, मार्च २०१७च्या निवडणुकीत पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. बेस्ट समिती अध्यक्षपदी निवडून आल्यावर आपण बेस्टला नफ्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही चेंबूरकर यांनी दिली.



हेही वाचा

शिवसेनेतील प्रवेश फळाला लागला! दिलीप लांडे सुधार समिती अध्यक्षपदी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा