Advertisement

शिवजयंतीची सुट्टी न दिल्याने शाळेसमोर आंदोलन


शिवजयंतीची सुट्टी न दिल्याने शाळेसमोर आंदोलन
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे शासकीय, निम शासकीय तसेच शाळा महाविद्यालयांना सुट्टी असतेच. मात्र, याला अपवाद ठरली ती परळ येथील जेबीसीएन इंटरनॅशनल शाळा. शाळा प्रशासनाने 'शिवजयंती हा आमचा उत्सव नाही, त्यामुळे शाळा नेहमीप्रमाणे सुरु राहील', असे निर्देश दिले.


शिवसेनेचा शाळेवर मोर्चा

शाळेने विद्यार्थ्याना सुट्टी तर दिली नाहीच, पण 'शाळेत जे विद्यार्थी येणार नाहीत, त्यांना मेमो दिला जाईल', अशी ताकीदही दिली होती. याची माहिती शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांना मिळाली. त्यांनी याबाबत शाळा प्रशासनाला विचारणा केली, तेव्हा त्यांनाही हेच उत्तर मिळाले. मग मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना घेऊन शिवसैनिकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि आंदोलन केले. त्यामुळे शाळेचे दैनंदिन कामकाज बंद पाडण्यात आले.


शाळा प्रशासनाची माघार

यावर शाळा प्रशासनाने माघार घेत पुन्हा असा प्रकार घडणार नाही आणि पुढच्या शैक्षणिक वर्षात शिवजयंतीचा समावेश इतर सुट्ट्यांमध्ये करणार, असं आश्वासन दिलं. त्यानंतर पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना घरीही सोडण्यात आलं.

शिवजयंती निमित्त शहरातील सर शाळांना सुट्टी असताना 'हा आमचा उत्सव नाही' असं सांगणं चुकीचं आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहेत. इतर दिवशी शाळांना सुट्टी दिली जात असताना शिवजयंती निमित्त सुट्टीवर शाळांची अरेरावी योग्य नाही.

अजय चौधरी, स्थानिक आमदार, शिवसेना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा