शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय तरुणाला चोपलं, तिघांना अटक


SHARE

दादरच्या प्रभादेवी येथे रस्त्यावर स्टॉल लावून बसलेल्या एका उत्तर भारतीय तरुणाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. विशाल पांडे असं त्या युवकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.


बुधवारी प्रभादेवी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात स्टॉल लावल्याच्या कारणातून विशाल पांडे या उत्तर भारतीय तरुणाला मारहाण केली. दरम्यान मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुटुंबियांचा आरोप

विशालला खण्याचे स्टॉल लावण्यापासून विरोध करत शिवसेनेत्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तर विशालची बहीण प्रियंकाचं म्हणणं आहे की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'ही त्यांची जागा असल्याचं सांगत येथे स्टॉल लावण्यास विरोध केला.

ऐवढंच नाही तर ही उत्तर भारतीयांची जागा नसून मराठी लोकांची जागा असल्याचंही त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आणि आपल्या भावाला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या