Advertisement

‘जीएसटी’सहीत पक्के बिल दाखवा आणि एक कोटी जिंका

दुकानातून खरेदी केली तरी पक्के बिल घ्यायला विसरू नका, कारण हेच अगदी किरकोळ रक्कमेचे बिलदेखील तुम्हाला एक कोटींचे बक्षीस जिंकून देऊ शकते

‘जीएसटी’सहीत पक्के बिल दाखवा आणि एक कोटी जिंका
SHARES

यापुढे तुम्ही कोणत्याही दुकानातून खरेदी केली तरी पक्के बिल घ्यायला विसरू नका, कारण हेच अगदी किरकोळ रक्कमेचे बिलदेखील तुम्हाला एक कोटींचे बक्षीस जिंकून देऊ शकते. वस्तू आणि सेवा कर विभागाने तशी योजनाच जाहीर केलीय. जीएसटी चोरी रोखण्यासाठी सरकारने ही आयडियाची कल्पना लढवलीय. येत्या १ एप्रिलपासून या लॉटरीला सुरुवात होऊ शकते. या योजनेत प्रत्येक महिन्याला दुकानदार आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहाराच्या प्रत्येक बिलाला लकी-ड्रॉमध्ये समाविष्ट केले जाईल. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या लॉटरीमध्ये उपभोक्त्यांना एक कोटींपयर्ंत बक्षीस मिळू शकतं.

हेही वाचाः- ​विधानसभा अध्यक्षांच्या रागापुढं अजितदादाही नरमले, भर सभागृहात मागितली माफी​​​

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ग्राहकाला दुकानदारांकडे आपल्या प्रत्येक खरेदीचं पक्कं बिल मागण्यासाठी ही योजना प्रोत्साहन देऊ शकते. जीएसटी चोरी रोखण्यासाठी याचा वापर होईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केलीय. या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही सीमा नाही. तुमचं बिल कोणत्याही रक्कमेचं असू द्या, त्याला कोणतीही जास्तीत जास्त किंवा कमीत कमी रकमेचं बंधन नाही. या लॉटरीत एक प्रथम विजेता निवडला जाईल. त्याला मोठ्या रकमेचं बक्षीस मिळू शकतं. त्यानंतर, राज्य स्तरावर दुसरा आणि तिसरा विजेता निवडला जाईल.या लॉटरीत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून त्याचं पक्कं बिल घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जीएसटीसहीत असलेलं पक्कं बिल स्कॅन करून एका अँपवर अपलोड करायचंय. हे अँप या महिन्याच्या शेवटपयर्ंत अन्ड्रॉईड आणि एप्पल उपभोक्त्यांसाठी उपलब्ध होईल.

हेही वाचाः- ​मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट​​​

या लॉटरीत एक लाखांपासून एक कोटींपयर्ंत बक्षीस मिळू शकेल. नफेखोरांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेतून ही बक्षिसाची रक्कम गोळा केली जाईल. जीएसटी कायद्यानुसार, नफेखोरांविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. यातून मिळालेल्या दंडाचा पैसा उपभोक्ता कल्याण कोषात ठेवला जातो, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा