Advertisement

विधानसभा अध्यक्षांच्या रागापुढं अजितदादाही नरमले, भर सभागृहात मागितली माफी

एरवी राजकीय कार्यकर्त्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच धडकी भरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) भर सभागृहात नरमलेले पाहायला मिळाले.

विधानसभा अध्यक्षांच्या रागापुढं अजितदादाही नरमले, भर सभागृहात मागितली माफी
SHARES
Advertisement

एरवी राजकीय कार्यकर्त्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच धडकी भरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) भर सभागृहात नरमलेले पाहायला मिळाले. त्यांनी चक्क विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Vidhan sabha president nana patole) यांची दिलगिरीही व्यक्त केली. अर्थात त्याला कारणंही तसंच होतं.

विधानसभेत (maharashtra vidhan sabha) प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शून्य प्रहरात (zero hour) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मागच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या ८३ औचित्याच्या मुद्द्यांपैकी केवळ ४ प्रश्नांचंच उत्तर प्रशासनाकडून मिळाल्याचं सांगत संताप व्यक्त केला. 

हेही वाचा- मुंबई ‘एपीएमसी’ महाविकास आघाडीच्या हाती, भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले Vidhan sabha president nana patole) यावेळी म्हणाले, मागच्या अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यापैकी ८३ प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याची उत्तरं प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मिळालेली नाहीत. त्याआधीची देखील अनेक प्रश्न प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये रेंगाळत पडलेली आहे. मी माझ्या कार्यालयामार्फत या प्रश्नांची उत्तरं तातडीने मिळावीत, यासाठी अनेकदा मुख्य सचिवांच्या कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला. परंतु माझ्या पत्रांनाचीही दखल घेण्यात आली नाही. मुख्य सचिवांसोबत माझं बोलणं झाल्यावर त्यांनी देखील केवळ प्रशासकीय काम सुरू असल्याचं सांगितलं. जे सदस्य आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी प्रश्न विचारत असतील आणि त्यांना योग्य वेळेत उत्तरं मिळत नसतील, तर मी हे खपवून घेणार नाही. 

ते पुढं म्हणाले, माननीय न्यायालय जेव्हा अशा प्रकरणांच्या बाबतीत एखाद्याला शिक्षा सुनावतात तेव्हा संबंधित व्यक्तीला जामीन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. परंतु जेव्हा विधानसभा अध्यक्ष एखादी शिक्षा सुनावतात, तेव्हा तिला कुठंही आव्हान दिलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा दफ्तरदिरंगाई आणि धिम्या कारभाराबद्दल राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता (principal secretary ajoy mehta) यांनी विधानसभेत येऊन याबाबत खुलासा द्यावा आणि सभागृहाची माफी मागावी, असे आदेश दिले. त्यानंतर सारं सभागृह अवाक झालं.

हेही वाचा- हा डोक्यावर पडला आहे काय? जितेंद्र आव्हाड अभिनेते शरद पोंक्षेवर चिडले

पटोले यांचा रुद्रावतार पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी मुख्य सचिवांच्या वतीने ताबडतोब यापुढं असं होणार नाही, असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली. राज्य सरकार घडलेल्या प्रकाराची दखल घेऊन यासंदर्भात बैठकीचे आयोजन करेल. असंही सांगितलं. त्यापाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस (devendra fadnavis) यांनी सुद्धा स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे माफी मागितली असून मुख्य सचिवांना बोलावून समज द्या, अशी विनंती केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आपली भूमिका सौम्य केली. परंतु जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत सदस्यांचा अपमान सहन करणार नाही, असा दमही त्यांनी दिला.

संबंधित विषय
Advertisement