Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट

मुंबईतील सतत बदलत्या वातावरणामुळं हवेची गुणवत्ता वाईत होत आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट
SHARES

मुंबईतील सतत बदलत्या वातावरणामुळं हवेची गुणवत्ता वाईत होत आहे. यामुळं मुंबईकरांना शुद्ध हवेमध्ये (Air) श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सोमवारी मुंबईतील माझगाव (Mazgaon) इथं हवेची गुणवत्ता अती वाईट असल्याचं समोर आलं. पीएम २.५ प्रदूषकांचं प्रमाण ३८० होतं. नवी मुंबईतही पीएम २.५ मुळं हवेची गुणवत्ता अती वाईट होती. वातावरण संस्थेनं फेब्रुवारीच्या मुंबईच्या हवेच्या (Mumbai Air) गुणवत्तेच्या केलेल्या विश्लेषणानुसार मागील महिन्यात बीकेसीत (BKC) १९ दिवस वाईट तर ५ दिवस अती वाईट हवेचे होते.

मुंबईची हवा १० दिवस वाईट स्वरूपाची होती. नवी मुंबईत २४ दिवस अती वाईट हवा होती. या पार्श्वभूमीवर हे प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मुंबईकर नोकरीच्या निमित्तानं बीकेसी, नवी मुंबई या परिसरात जात असतात. या नोकरदार (Workers) मुंबईकरांना सातत्यानं प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे.

'वातावरण' या संस्थेतर्फे फेब्रुवारी महिन्याच्या हवेच्या गुणवत्तेचं विश्लेषण करण्यात आलं आहे. सफर या हवामान प्रणालीनुसार नोंदवण्यात आलेल्या निर्देशांकानुसार फेब्रुवारीत हवेच्या गुणवत्तेचा सर्वाधिक निर्देशांक २८१ पर्यंत पोहोचला होता. बीकेसीमध्ये हा निर्देशांक ३४२ होता तर नवी मुंबईमध्ये हा निर्देशांक ४०४ होता. सातत्याने अशा हवेमध्ये श्वासोच्छवास करून मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहेत.

२९ दिवसांपैकी १० दिवस मुंबईची एकंदर हवा वाईट स्वरूपाची होती तर बीकेसीमध्ये एकूण २४ दिवस हवेची गुणवत्ता घसरलेली होती. नवी मुंबईत तर एकूण २७ दिवस प्रदूषित हवेचा सामना करावा लागला. फेब्रुवारीमध्ये हवेतील उष्मा वाढायला लागला होता. आताही तापमानात वाढ झालेली आहे. त्यातच सोमवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०१ नोंदवला गेला असून, मंगळवारीही हा निर्देशांक २०५ असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवेची गुणवत्ता वाईट होत असल्यानं हवा प्रदूषित करणाऱ्या उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई आणि बीकेसीमध्ये सातत्यानं हवेची गुणवत्ता खालावलेली आढळते. त्यामुळं याचंही विश्लेषण अपेक्षित असून, बांधकामांचे नियम पाळले न जाणे, उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण नसणे, वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण याबद्दल न होणारी कार्यवाही आणि प्रदूषणाबद्दल जनजागृतीचा अभाव हे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचं समजतं.हेही वाचा -

दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधात कारवाई

Best Of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १०वीची परीक्षासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा