Advertisement

मल्लखांबाच्या प्रशिक्षणासोबतच स्वच्छतेचा संदेश!


मल्लखांबाच्या प्रशिक्षणासोबतच स्वच्छतेचा संदेश!
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे व्यायाम आणि मल्लखांबाचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. मुलांना मल्लखांब या विषयाची माहिती मिळावी, त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिर कार्यरत आहे. पण त्याचबरोर आता झाडांची देखभाल करण्यासाठी समर्थ व्यायाम मंदिर एक वेगळा उपक्रम राबवत आहे. यामध्ये व्यायाम मंदिराच्या आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा एकत्र करून त्यापासून व्यायामशाळेच्या गच्चीवर खत बनवलं जात आहे. झाडांच्या संरक्षणासाठी त्या खताचा वापर केला जातो.

'हेल्थ इज वेल्थ' हे खरं आहे. पण जर आपण फक्त व्यायाम करत राहिलो आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर आणि स्वच्छ नसेल तर, कुणालाही व्यायाम करवासा वाटणार नाही. आमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा या उद्देशाने 3 वर्षांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता.
- उदय देशपांडे, विश्वस्त, श्री समर्थ व्यायाम मंदिर

शिवाजी पार्कमधील झाडांच्या आसपासचा पालापाचोळा दर दिवशी उचलला जातो आणि त्यापासून खत तयार केले जाते. या उपक्रमात व्यायाम मंदिरात कार्यरत असलेले शिपाई राजेंद्र गमरे आणि बलवीर गायकवाड या दोघांचा खारीचा वाटा असल्याचेही श्री समर्थ व्यायाम मंदिराचे विश्वस्त उदय देशपांडे यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा