कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

  Parel
  कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
  मुंबई  -  

  भारतीय नागरिक आणि नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना रॉ चा गुप्तहेर असल्याचे ठरवून त्यांना फाशीची शिक्षा पाकिस्तानी लष्कर कोर्टानं ठोठावली आहे. पाकिस्तानच्या या कृ्त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्याकरता आणि त्यांच्या समर्थनार्थ लालबाग येथे मंगळवारी भाजपाच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्थानिक नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' चे फलक घेऊन रस्त्यावर उतरत नारे लावले. पाकिस्तानच्या या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध संपूर्ण देशभरात अशा वेगवेगळ्या मोहिमेतून निषेध व्यक्त केला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.