Advertisement

२ ऑक्टोबरपासून मुंबई विमानतळावर १०० टक्के प्लास्टिकमुक्ती

२ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी मुंबई विमानतळावर एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. मग या प्लास्टिकला काय आहे पर्याय? वाचा...

२ ऑक्टोबरपासून मुंबई विमानतळावर १०० टक्के प्लास्टिकमुक्ती
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून १०० टक्के प्लास्टिकमुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नका, असं आव्हान केलं होतं. त्यानुसार विमानतळावर एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.


प्लास्टिकला पर्याय काय?

थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (२०० एमएलपेक्षा कमी), प्लास्टिक बॅग (हँडल आणि हँडल शिवाय असलेल्या), स्ट्रॉ, बबल रॅपर आदींच्या वापरावर बंदी असेल, असं विमानतळ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी तसंच अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू आणि कापडी पिशव्यांचा वापर केला जाणार आहे.


अखेर मुहर्त सापडला

भारतीय विमानतळ प्राधिकरणानं देशभरातील १२९ विमानतळे प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. यांपैकी ३५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र मुंबईच्या विमानतळावर या मोहिमेची अंमलबजावणी लांबलेलीच होती. पण अखेर याचा मुहर्त सापडला असून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईचे विमानतळ प्लास्टिकमुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकत आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा