धोक्याचा स्कायवॉक

 Pali Hill
धोक्याचा स्कायवॉक
धोक्याचा स्कायवॉक
धोक्याचा स्कायवॉक
See all

वांद्रे - वांद्रे स्टेशनमधील स्कायवॉक गेले काही दिवस अंधारात आहे. कारण या स्कायवॉकवरची वीजच गायब झाली आहे. वीज नसल्यामुळे या स्कायवॉकवर चोर, गर्दुल्ल्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. रात्र झाली की चोर,गर्दुल्ले स्कायवॉकवर ठाण मांडतात. वांद्र्यात मोठमोठ्या खासगी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी प्रामुख्याने याच स्कायवॉकचा वापर करतात. स्कायवॉकवरच्या या चोर-गर्दुल्ल्यांचा प्रचंड मनस्ताप होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

Loading Comments