दादरमध्ये स्लॅब कोसळून पाच जण जखमी

 Dadar (w)
दादरमध्ये स्लॅब कोसळून पाच जण जखमी
Dadar (w), Mumbai  -  

दादरच्या एन सी केळकर रोडवर असलेल्या विसावा हॉटेल परिसरातील कोमल इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे 5 जण जखमी झाले.

बुधवारी दादरच्या एन सी केळकर रोडवरील कोमल इमारतीचा स्लॅब दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या 4 जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले तर 17 वर्षांच्या सानिका कारंडे या मुलीच्या पायला दुखापत झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments