प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस बंदोबस्त

  Mumbai
  प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस बंदोबस्त
  मुंबई  -  

  मुंबई - प्रजासत्ताकदिनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतदेखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला आहे. महत्त्वाच्या सरकारी इमारती, रेल्वे स्थानके, विमानतळ, तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांबरोबरच शीघ्रकृती दल, राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. मुंबईच्या हद्दीत पॅराशूट, पॅरारायडिंग, रिमोटवर चालणारे ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  सी विभागतील गिरगाव चौपाटी, ठाकूरद्वार, नागपाडा, दोनटाकी, जे. जे. मार्ग त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यासह दाटीवाटीच्या वस्तीतील संशयित गेस्ट हाऊस, हॉटेल्स, लॉजची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.