Advertisement

ठाणे स्टेशनजवळ लोकलमध्ये आढळला साप

ठाण्याहून सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान साप आढळून आला. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याने लोकल मध्येच थांबली. यामुळे मागच्या लोकल गाड्याही थांबल्या.

ठाणे स्टेशनजवळ लोकलमध्ये आढळला साप
SHARES

कधी रेल्वे रुळाला तडे जातात तर कधी रुळावर पाणी साचतं आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं ट्रेन बंद पडते. मात्र गुरुवारी चक्क एका सापाने लोकल रोखून धरली. 



ठाण्याहून सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान साप आढळून आला. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याने लोकल मध्येच थांबली. यामुळे मागच्या लोकल गाड्याही थांबल्या. 


अखेर सापाला बाहेर काढलं

सकाळी 8.33 वाजण्याच्या दरम्यान टिटवाळ्याहून निघालेली लोकल 9.20 ला ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर पोहचली. त्यावेळी या लोकलमधील एका प्रवाशाचं लक्ष पंख्याकडे गेलं. तेव्हा तिथे साप आढळून आला. त्याने इतर प्रवाशांचंही त्याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे रेल्वेच्या डब्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान प्रवाशांनी चेन ओढत लोकल थांबवली. दरम्यान तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घेत त्या सापाला एका लाकडी पट्टीच्या मदतीनं बाहेर काढलं आणि नंतर लोकल सुरू झाली.


हेही वाचा -

ठाण्यात तरुण रेल्वेखाली, वाहतूक विस्कळीत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा