Advertisement

ग्रॅण्टरोड परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला

अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

ग्रॅण्टरोड परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला
SHARES

मुंबईच्या ग्रॅण्ट रोड परिसरात जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जिवीत  हानी झालेली नाही. अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

ग्रॅण्ट रोडच्या पाववाला स्ट्रीट, ड्रीमलॅड सिनेमाजवळ ही ग्राऊड प्लस ३ अशी रहिवाशी स्थित इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्यामाळ्यावरचा भाग बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने इमारत रिकामी करत या दुर्घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिस नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला पाचरण करून मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.  

संबंधित विषय
Advertisement