Advertisement

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क


मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क
SHARES

मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्यांकडून  नागरिकांनी सोमवारी ठिक ठिकाणी धरणे आंदोलन केले. त्या पार्श्वभूमिवर मुंबईत ठिक ठिकाणी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला होता. लाँकडाऊननंतर पहिलेच अधिवेश होत असल्याने मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदान येथील आंदोलनात मोठी गर्दी केली होती.या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर गैरप्रकार घडू नये, यासाठी मुंबईत दाखल होणा-या मार्गांवर विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली.

हेही वाचाः- प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

सरकारी विभागात  निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या २१२५ तसेच इतर उमेद्वाराना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणी करिता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नाशिक येथून मोठ्याप्रमाणात तरूण येणार असल्याची शक्यता लक्षात घेता रविवारपासूनच राज्यभरातून आंदोलनकर्ते दाखल होण्यास सुरूवात झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर गैरप्रकार घडू नये, यासाठी मुलुंड, वाशी येथील टोलनाक्यांवर विशेष तपासणी करण्यात आली. संशयीत व्यक्तींची ओळखपत्रे तपासली जात होती. याशिवाय सीएसटी परिसरातही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी त्यात २०० हून अधिक अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.

हेही वाचाः- कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

तसेच गैरप्रकार घडू नये, यासाठी बॉम्ब शोधक पथकाच्या मार्फतही परिसराची यापूर्वीच तपासणी करण्यात आली होती. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिका-यांना घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली होती.अधिवेशन सुरू झाल्यामुळे कोरोनाकाळात बंद असलेले आझाद मैदानात प्रथमचे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी उपस्थीत झाले होते. मोर्चात सहभागी बहुतांश तरूण नाशिकमधील होते. याशिवाय आणखी दोन मोर्चे तेथे आले होते. सर्वांचे म्हणणे सरकार दरबारी पोहोचवण्यात आल्याचे आश्वासन देण्यात आले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा