14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नावनोंदणी

 Pali Hill
14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नावनोंदणी
14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नावनोंदणी
14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नावनोंदणी
14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नावनोंदणी
See all

मुंबई - एप्रिल 2017 मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत मतदान करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. जी मुले 1 जानेवारी 2017 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करतील, ते मतदान करु शकतील, तसेच ज्यांची नावे दोन वेळा असतील आणि मृत झालेले व्यक्तींची नावे वगळू शकतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. मुंबई पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या दरम्यान याद्या पुन्हा बनवण्यात येणार आहेत. त्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्याचे काम आयुक्तानी दिले आहेत.

मतदार जागृतीसाठीचे उपक्रम

• विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा मतदार जागृतीत सहभाग

• विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था

• मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून मतदारांना आवाहन

• सहकारी गृहनिर्माण संस्थांना 100 टक्के मतदार नोंदणीचे आवाहन

• मतदार जागृतीसाठी मोबाईल कंपन्यांकडून जनहितार्थ एसएमएस

• उद्योजक, बँक व कंपन्यांना मतदार जागृतीसाठी आवाहन

• कम्युनिटी रेडिओच्या माध्यमांतून मतदार जागृती

• सोशल मीडियाचा मतदार जागृतीसाठी वापर

• विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर्स स्पर्धेंचे आयोजन

• नाटकांच्या मध्यांतरात थिएटरमध्ये मतदार जागृतीची घोषणा

Loading Comments