Advertisement

जसलोक रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभाग


जसलोक रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभाग
SHARES

आयुर्मर्यादेमध्ये वेगाने होत असलेली वाढ लक्षात घेता वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय विभागाची गरज निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेत जसलोक रुग्णालय आणि संशोधन केंद्रानं नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभागाची सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार विविध आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या समस्या सोडवण्यासाठी जसलोक रुग्णालय विशेष प्रयत्न करणार आहे. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्या हस्ते जेरियाट्रिक विभागाचं उद्घाटन करण्यात आलं.


म्हणून या विभागाची सुरुवात

रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, २०१२ ते २०५० पर्यंत आशिया खंडातील वृद्ध व्यक्तींचं प्रमाण १०.५ टक्क्यांवरून २२.४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं काळाची गरज ओळखून या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे.


घरपोच वैद्यकीय सुविधा

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या या विभागाद्वारे सोडवण्यास मदत मिळणार आहे. या रुग्णालयाचे ज्येष्ठ नागरिक उपचारकक्षाचे प्रमुख डॉ. नागनाथ प्रेम असून सध्या या विभागाद्वारे बाह्य रुग्ण कक्ष, रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी विशेष विभाग, घरी जाऊन विशेष सेवा पुरवण्यासाठी वैद्यकीय सुविधा याशिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा