Advertisement

झोपु रखडवणाऱ्या 24 बिल्डरांना झोपुचा दणका


झोपु रखडवणाऱ्या 24 बिल्डरांना झोपुचा दणका
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास योजना हाती घेऊन दहा ते पंधरा वर्षे होऊन गेली तरी योजना मार्गी न लावणाऱ्या आणि रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना अखेर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दणका देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत 208 बिल्डरांनी दहा ते पंधरा वर्षे प्रकल्प रखडवले असल्याचे स्पष्ट झाले असून यातील 24 झोपु योजना अर्थात योजनेच्या परवानग्या रद्द केल्या असल्याची माहिती झोपु प्राधिकरणाचे सचिव संदीप देशमुख यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. रद्द 24 प्रकल्पांची यादी 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.

झोपु योजनेसाठी परवानगी घ्यायची, झोपुवासियांना विस्थापित करत संक्रमण शिबिर वा भाड्याने इतरत्र स्थलांतरित करत झोपड्या पाडायच्या, पण त्यानंतर बांधकाम काही करायचे नाही, असा ट्रेण्डच अनेक बिल्डरांनी झोपु योजनेत सुरू केला आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी झोपु प्राधिकरणाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींनुसार प्राधिकरणाने दहा ते पंधरा वर्षे रखडलेल्या योजनांचा आढावा घेत त्यांच्या सुनावणीला सुरूवात केली आहे. त्यानुसार 208 योजनांमधील 124 योजनांची सुनावणी पूर्ण झाली आहे. 124 पैकी 24 योजनांसंबंधी अंतिम निर्णय घेत त्यांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. 208 मधील 24 बिल्डर्सना दणका दिल्यानंतर आता उर्वरित 184 बिल्डर्सचं काय होणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आता या रद्द झालेल्या झोपु योजनांमधील झोपुवासियांना नव्याने विकासक नेमण्याची परवानगी देत पुनर्विकास मार्गी लावण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे. विकासक नको असेल तर झोपुवासियांनी तशी मागणी करावी ही मागणी सरकारसमोर ठेवत झोपु प्राधिकरणाला प्रकल्प मार्गी लावता येईल का याची चाचपणी करण्यात येईल, अशी माहिती झोपु प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे वा आर्थिक कारणांमुळे योजना रखडल्या असल्याचे यातून समोर आले असले तरी अनेक बिल्डरांनी जाणीवपूर्वक प्रकल्प रखडवल्याचेही स्पष्ट झाले आहे. झोपुवासियांची अशी पिळवणूक करणाऱ्या बिल्डरांना अखेर दणका दिला जात असल्याने हा झोपु प्राधिकरणाचा मोठा आणि चांगला निर्णय मानला जात आहे.

रद्द झालेले 24 प्रकल्प

योजनेचे नाव
ठिकाण
समूह (बिल्डर)चे नाव
गणेशनगर
बोरीवली, मागाठणे
धनश्री डेव्हलपर्स
समता सहकारी सोसायटी
पहाडी, गोरेगाव
मे. डियासॉन्स इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड फायनान्स प्रा. लि.
अमन एकता सहकारी सोसायटी
गोरेगाव
मे. डियासॉन्स इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड फायनान्स प्रा. लि.
न्यू नवरत्न वक्रतुंड
कुरार व्हिलेज, बोरीवली
मे. माऊली साई डेव्हलपर्स
आदर्श सहकारी सोसायटी
पागडी, गोरेगाव
मे. कुणाल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स
साहिल सहकारी सोसायटी
कांदिवली
मे. फ्रिस्कान इन्फ्रा प्रा. लि.
श्री साईकृपा बजरंग सोसायटी
कांदिवली
मे. परेश वालिया अॅण्ड असोसिएट
जनता कल्याणकारी
कांदिवली
सिद्धार्थ बिल्डर्स
नवशक्ति नगर सोसायटी
ओशिवरा
मे. विजय रिएल्टर्स
फ्लायओव्हर सोसायटी
दिंडोशी
मे. लकी डेव्हलपर्स
हरि ओम सोसायटी
वांद्रे
आमीकृपा लॅण्ड डेव्हलपर्स
मोतीलाल नेहरू सोसायटी
अँटॉप हिल
मे. पंक्ती हाऊसिंग प्रा. लि.
गणेश नगर सोसायटी
लोअर परळ
लोखंडवाला डेव्हलपर्स
किशोर किरण सोसायटी
लोअर परळ
मे. स्कायलार्क बिल्डकॉन प्रा. लि.
भाई बंदरकर
कुलाबा
मे. माझसन बिल्डर्स
एकविरा विहार सोसायटी
मुलुंड
मे. रामचंद्र पाटील
मोर्या एसआरए सोसायटी
देवनार
मे. मोर्य होम्स
सनराईज सोसायटी
कुर्ला
मे. मिडास डेव्हलपर्स
आनंद नगर एसआरए सोसायटी
बोर्ला
मे. अभिनी डेव्हलपर्स
अष्टविनायक एसआरए सोसायटी
घाटकोपर
एस.एस. व्ही. रिएल्टर्स
श्री सिद्धीविनायक सोसायटी
कांदिवली
यश बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स
जनता एसआरए सोसायटी
वडाळा
मे. एस. के. कॉर्पोरेशन
संजीवनी एसआरए सोसायटी
घाटकोपर
मे. वैभव लक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स
न्यू साफल्य सोसायटी
वांद्रे (पूर्व)
मे. आमीकृपा लॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा