चेंबुरमध्ये खाजगी विकासकासाठी दुकानदारांचा बळी?

 Amar Mahal
चेंबुरमध्ये खाजगी विकासकासाठी दुकानदारांचा बळी?
Amar Mahal, Mumbai  -  

चेंबूर - रस्ता रुंदीकरणात बाधित असलेल्या दुकानदारांना पूर्वसूचना न देताच पालिकेने कारवाई सुरू केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. चेंबूरच्या अमर महल परिसरातील ही घटना असून याठिकाणी रस्त्यालगत एकूण दोनशे दुकानं आहे.

दुकानदारांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही. मात्र याच परिसरात एका खासगी विकासकाकडून एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना ही दुकाने अडथळा ठरत असल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने विकासकाने आम्हाला बाहेर काढले असल्याचा आरोप दुकानदार तातोबा झेंडे यांनी केला आहे.

विकासकाच्याच सांगण्यावरून तीन दिवसांपूर्वी चार दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Loading Comments