Advertisement

निवडणुकीसाठी को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांची धावपळ


SHARES

मुंबई - पालिका निवडणुकांसाठी सहकार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिंग बुथवर स्वयंसेवक म्हणून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि यासाठी २० फेब्रुवारीच्या आत संबंधित प्रशिक्षणासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेणेही बंधनकारक केले आहे. तशी ती घेतली नाही तर या सोसायट्यांवर कारवाईही होऊ शकते. ऑक्टोबरमध्ये सरकारने हा अध्यादेश जारी केला. मात्र त्यासाठीच्या सर्वसाधारण सभेचं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे सोसायटी पदाधिकाऱ्यांना कमी वेळात सभा घ्यायची तरी कशी? असा प्रश्न पडलाय. ऐन वेळी आलेल्या या परिपत्रकामुळे सोसायट्यांमध्ये नाराजी असली तर मतदानाचा प्रश्न असल्यानं बऱ्याचशा सोसायट्यांनी सभा घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र सभा घेणं शक्यच झालं नाही तर कारवाई करू नये अशी मागणी आता सोसायट्यांसह संघटनांनी उचलून धरली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा