Advertisement

दारू विक्रीतून महाराष्ट्राला ४ दिवसांत १५० कोटींचा महसूल!


दारू विक्रीतून महाराष्ट्राला ४ दिवसांत १५० कोटींचा महसूल!
SHARES

महाराष्टात लाँकडाऊनमुळे तळीरामांचे चांगलेच वांदे झालेले पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारने महाराष्ट्रात लॉकडाउनमध्ये शिथिलता कमी करून अन्य राज्यांप्रमाणे 4 मे पासून कंटेंट झोन वगळता मद्य दुकानांसह, स्टँडअलोन दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. माञ ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच मध्यराञीपासून तळीरामांनी दारूखरेदीसाठी दुकानाबाहेर गर्दी केली. त्यामुळेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळले गेल्यामुळे सरकारने  नॉन-कंटेन्टमेंट मध्येचं दारू विक्रीला परवानगी दिली. माञ या 4 दिवसात महाराष्ट्राच्या महसूल विभागात 150 कोटींचा महसूल जमा झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावरोखण्यासाठी  लॉकडाउनमुळे सुमारे 40 दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लाँकडाऊन तिसऱ्या टप्यात वाढवल्यानंतर सरकारने आर्थिक गाडा सुरळीच चालावा. यासाठी आता राज्यातील नॉन-कंटेन्टमेंट  झोन मधील दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील 10,822 परवान्यावरील दारूची दुकाने असून त्यापैकी 3,261 पुन्हा उघडण्यात आल्या आहेत," असे अधिकाऱ्याने सांगितले.

लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला असला तरी, राज्य सरकारने दिलेली सवलत म्हणून स्वतंत्र दारूची दुकानं ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली होती. "बुधवारी सायंकाळपर्यंत राज्याला 100 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला होता. त्यात आणखी 48.14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे अधिकाऱ्याने म्हटले. गुरुवारीच अंदाजे 13.82 लाख लिटर बाटलीबंद भारतीय मेड मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल), बिअर, वाइन आणि देशी दारू विकली गेली, असे त्यांनी सांगितले. 

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील नियमांनुसार, हिरव्या, ऑरेंज आणि लाल (नॉन-कंटेन्टमेंट) झोनमधील स्टँडअलोन दारूची दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दारूच्या दुकानाबाहेर दारू खरेदी करण्यासाठी उत्साही लोकांची गर्दी जमू लागली होती. "मुंबई, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमधील सद्य विक्रीला सध्या कोविड-19 मुळे बंदी आहे, परंतु गेल्या एका दिवसात राज्यातील अन्य 18 जिल्ह्यांतील 2,967 दारू दुकानातून एकूण 12.50 लाख लिटर विविध प्रकारचे मद्य विकले गेले आहे."

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा